Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगौताळ्यात वणवा रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज

गौताळ्यात वणवा रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज

औरंगाबाद – aurangabad

जैवविविधतेने मराठवाड्यातील (Marathwada) सर्वात समृध्द अभयारण्य म्हणून गौताळा औट्रम घाट अभयारण्याचा लौकिक आहे. मात्र हे शुष्क पानगळीचे अभयारण्य असल्यामुळे उन्हाळ्यात वणवे लागतात. ते रोखण्यासाठी अभयारण्यात (Sanctuary) आगरेषा घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल राहूल शेळके (Forest Ranger Rahul Shelke) यांनी दिली.

- Advertisement -

गौताळा अभयारण्य मराठवाडा, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील सीमेवर २६१ चौ.कि.मी क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे. हे अभयारण्य समतिष्ण कटीबंधातीलळ आहे. सरासरी ७४९ मि. मि. पाऊस पडतो. त्यामुळे ऊन्हाळ्यात बहुतांश सर्व वृक्षांची पानगळ होते. खाली पडलेला पाला पाचोळा हा पेट्रोल इतकाच ज्वलनशील असतो.त्यामुळे कोणत्याही कारणाने अभयारण्यात वणवे लागतात. अभयारण्यातून कननड-नागद, करंजखेडा, कन्नड-सिल्लोड, कन्नड-चाळीसगाव हे रस्ते जातात.

प्रवाशी बिडी, सिगारेट पेटवून ते रस्त्याच्या कडेला टाकतात. वाहनांच्या सायलेन्सरमधून ठिणग्या ऊडून वाळलेल्या पाचोळ्यावर पडून आग भडकते. त्यामुळे वणवे भडकतात. मोहळ व वनोपज गोळा करण्यासाठीही आग पेटवण्यात येते.अभयारण्यालगतचे शेतकरी आपल्या शेतातील काडी, कचरा पेटवून देतात त्यामुळे वार्‍याने अभयारण्यात वणवा भडकतो. वनकर्मचाऱयांनी अभयारण्यातील सर्व रस्त्यावर आगरेषा घेतल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील आग जंगलात जात नाही. दरम्यान, अभयारण्यातील वणवे विझवण्यासाठी सोळा फायर ब्लोर मशीन तयार असून संदीप मोरे, पोपट बोर्डे, के. व्ही. रायसिंग, पी.जे.पारधी, मनोज उदार हे पाच वनपाल कार्यरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या