Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजायकवाडीचे आपत्कालीन दरवाजे ; गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडीचे आपत्कालीन दरवाजे ; गावांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद – aurangabad

नाशिक (Nashik) व परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) जायकवाडी (Jayakwadi) जलाशयातून यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा विसर्ग करावा लागत आहे, गेल्या दोन वषाच्या तुलनेत हे प्रमाण आधिकचे असुन परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग शुक्रवारपासून (दि.२) करण्यात येत आहे. अकरा दिवसाच्या उघडीपनंतर गेल्या दोन दिवसात नाशिक, सिन्नर, शिर्डी व राज्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने जायकवाडी प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता थेट ४ फुटाने दरवाजे उघडून जलाशयात ७५ हजार ४५६ क्युसेक्सने पाणी सोडावे लागले आहे.

- Advertisement -

पैठण (Paithan) येथील जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) सात आपत्कालीन दरवाजे काल शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान उघडण्यात आल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी व शुक्रवारी नाशिक परिसरातील धरणातून जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यामुळे जायकवाडी धरणाचा १८ नंबरचा दरवाजा चार फुट, त्याचबरोबर आपत्कालीन २ ते ८ नंबरचे सात दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आल्याने यंदा पहिल्यांदाच गोदावरी पात्रात ७९ हजार १२४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

काल शुक्रवारी संध्याकाळी तहसीलदार शंकर लाड यांनी महसूल पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी आकाश गाडगे, बी. टी. धारकर यांनी धरणात येणाऱ्या पाण्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांच्याकडून घेतल्यावर गोदाकाठी असलेल्या आपेगाव, वडवळी, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, पाटेगाव, नायगाव या गावातील नदी काठावर असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये संबंधित ग्रामसेवक, तलाठी यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

७५ हजाराने क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होताच गोदावरी नदीतील पाणी पार गागाभट्ट चौकापर्यंत येते, तर पात्राला जोडलेले नाले देखील फुगतात, ७५ हजार ते १.५ लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर पाणी थेट शहरात घुसते त्यापेक्षा अधिक म्हणजे २ ते २.५ लाखाने पाणी सुटल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते, नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे संभाव्य नुकसान पाहता शहराला संरक्षण भितींची गरज असल्याचे मत मुख्यधिकारी संतोष आगळे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या