श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार

coronavirus जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये प्रार्दुभाव वाढू नये, याकरीता मंदिरात उत्सव होणार
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार
dagdusheth halwai ganpati pune

पुणे (प्रतिनिधि) Pune - पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती dagdusheth halwai ganpati हे गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. त्याचा दरवर्षीचा एकूणच डामडौल डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी हे त्याचे वैशिष्ट्य. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रार्दुभाव वाढू नये, याकरीता लोकभावना जपण्यासाठी मंदिरात उत्सव होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो.

१२७ वर्षात यंदा प्रथमच परंपरा खंडित

मात्र, गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

व सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही.

श्रींचे ऑनलाईन दर्शन

घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com