Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedखूशखबर... यंदा गणेश मंडळांना शुल्कमाफी!

खूशखबर… यंदा गणेश मंडळांना शुल्कमाफी!

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाचे (corona) निर्बंध शिथिल झाल्याने यंदा सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होणार आहेत. शिंदे सरकारनेही यंदा दहीहंडी महोत्सवात (Dahi Handi Festival) गोविंदासाठी १० लाखांचा विमा काढण्याचा व दहीहंडाला खेळाचा दर्जा देत नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता गणेशोत्सवातही (Ganeshotsav) गणेशभक्तांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना दरवर्षी स्टेजसाठी भाडे द्यावे लागत होते. मात्र, यंदा विनाशुल्क परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात सूचना राज्यातील सर्वच महापालिकांना (Municipality) सूचना शिंदे सरकारने केल्या आहेत.

- Advertisement -

औरंगाबादेत लवकरच धावणार मेट्रो!

यंदा सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणरायाचे यंदा ३४ ऑगस्टला आगमन होत आहे. त्यासाठी मंडळांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी औरंगाबाद पालिकेतर्फे दरवर्षी शहरात एक खिडकी योजना राबवली जाते. त्यात पोलीस व वीज वितरण कंपनीचा देखील सहभाग असतो.

अनेक वर्षे नाममात्र शुल्क आकारून गणेश मंडळांना स्टेजसाठी परवानगी दिली जात होती. मात्र मागील काही वर्षात स्क्वेअर फुटानुसार शुल्क आकारले जात होते. त्याला गणेश मंडळांकडून विरोध होत होता. काही दिवसांपूर्वी एका शिष्टमंडळाने पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत यंदा नाममात्र शुल्क घेऊन गणेश मंडळांना स्टेजसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.

त्यात आता शिंदे सरकारकडून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीचे इतिवृत्त सर्व पालिकांना पाठवण्यात आले आहे. त्यात गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगी देण्यात येणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या