Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबनावट ऊंट बीडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

बनावट ऊंट बीडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

मलकापुर – Malkapur

राज्यात प्रचलीत ऊंट बीडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती..तर आज या कारवाईतील इतर आरोपींसह मुख्य आरोपीस मलकापूर शहर पोलीसांनी गोंदिया येथुन अंदाजे दिड लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मध्यप्रदेशातील बुऱ्हानपुर येथुन बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट बिड्या विक्री केल्या जात असुन या मुळे शासनाला टैक्स भरून हा व्यवसाय करणाऱ्या बीडी कंपनीला आर्थीक नुकसान होत होते

मलकापूर येथे बनावट ऊंट बिडी विकल्या जात असल्याची माहिती या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला मिळाली होती.या बाबतची शाहनिशा केल्या नंतर ऊंट बीडीचे सर्वेअर अमोल कुलकर्णी यांनी तक्रार मलकापुर शहर पोलसात दिल्याने पोलिसाने या तक्रारीवरून 12 मार्च रोजी मलकापुर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर धाड टाकून दुकानातून ऊंट बीडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला होता.

यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याचे विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 102 , 103,104 तसेच कॉपीराईट एक्ट 1957 चे कलम 51 व 63 आणि भादवीच्या कलम 420 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास केला असता बुरहानपुर येथील दिनेश हुंदराज शतवानी यांनी मलकापूर येथील रामचंद्र ट्रेडर्स यांना बनावट बिडी विक्री केल्याचे समजले मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या दबंग महिला एपीआय स्मिता म्हसाये व त्यांची टीम तात्काळ बुऱ्हाणपूरला रवाना होत बुऱ्हाणपूर येथे पोहोचून दिनेश हुंदराज शतवानी याला ताब्यात घेत सदर आरोपीला मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली होती.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यालासुद्धा पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता बऱ्हानपुर येथीलच भजनलाल जयरामदास भोजवानी हा देखील सदर आरोपींना बनावट बिडी विक्री करण्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथून भजनलाल जय रामदास भोजवानी व मिनी फॅक्टरी चालवणाऱ्या रोशन खान हुसेन खान याला सुद्धा अटक केली व त्याला देखील पाच दिवसांचा पीसीआर देण्यात आला त्यांनी दिलेल्या कबुली वरून गोंदिया येथील मुख्य आरोपी इम्रान युनुस पोथीयावाला हा गोंदिया येथे मोठ्या प्रमाणात बनावट उंट बिडी तयार करत होता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून बनावट बिडी तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली सदर कारवाई मध्ये एक लाख 27 हजार 89 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास अरविंद चावरीया जिल्हा पोलीस अधीक्षक, हेमराजसिंह राजपुत अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, दिलदार तडवी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर, प्रल्हाद काटकर शहर पोलीस निरीक्षक मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये सोबत पोकॉ. मंगेश चरखे , पोकॉ.प्रमोद राठोड यांचे पथकाने एका आठवडयाच्या आत नकली उंट बीडी बनविणाऱ्या आरोपींची साखळी तोडुन १५ दिवसांत संपुर्ण तपास यशस्वीपणे पूर्ण केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या