शहरातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘अव्याना’!

जी २० परिषदेत थाटात प्रकाशन
शहरातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘अव्याना’!

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar


ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात जी २० परिषदेच्या डब्ल्यू २० च्या रूपाने आजघडीला महिलांचे (women) स्थान आणि वैश्विक समानतेच्या विषयाचा वेध घेणारी विशेष बैठक पार पडली. यानिमित्ताने कॉफी टेबल बुक (coffee table book) '‘अव्याना’ : जर्नी ऑफ ब्रेव अँड बोल्ड इंनरप्राईजिंग वूमन'चे प्रकाशन करण्यात आले. शहरातील २६ महिलांच्या कार्याची नोंद यात आहे. या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत समाजहिताचाही विचार प्राधान्यक्रमाने केला आहे. त्यामुळे हे पुस्तक विशेष आहे. शहराच्या इतिहासात कर्तृत्ववान महिलांची एकत्रित नोंद पहिल्यांदाच झाली आहे.

शहरातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘अव्याना’!
भरदिवसा व्यापाऱ्याला लुटणारे जेरबंद

उद्योजक मुकुंद कुलकर्णी, प्रसाद कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या पुस्तकाचे संपादन मैथिली तांबोळकर, केतकी कोकीळ, रूचिरा दर्डा यांनी केला आहे. टीम ऑफ असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीने प्रकाशित हे पुस्तक व्हावे यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला.

पुस्तकात भोलेश्वर फळभाजी पाला उद्योग या माध्यमातून बहुगुणी आवळ्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या उद्योजक सीताबाई मोहिते, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रभावती पडूळ, मराठवाड्यात ओडिसी, कथक रूजवणाऱ्या, कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या गुरुकुल महागामीच्या पार्वती दत्ता, उपेक्षित वर्गातील महिलांसाठी साडी बँक, विविध उपक्रम, संशोधने राबविणाऱ्या आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आरतीश्यामल जोशी यांच्या कार्याची सचित्र माहिती आहे.

प्रथम स्वयंपाकघराच्या माध्यमातून घरची चव ग्राहकांना देणाऱ्या नंदिनी चपळगावकर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यपदार्थाचा कच्चामाल पोहोचविण्यात यशस्वी झालेल्या शोभा राठोड, लोकमत मॅरेथॉन कल्चर पूर्ण महाराष्ट्रात जावे यासाठी झटणाऱ्या रूचिरा दर्डा, संजीव ग्रुपच्या सर्वेसर्वा उद्योजक मैथिली तांबोळकर, ग्राइंड मास्टर मशीनच्या व्यवस्थापकीय संचालिका मोहिनी केळकर, ऑरगॅनिक अम्ब्रेलाच्या माध्यमातून १७५ सेद्रिंय उत्पादने ग्राहकांना देणाऱ्या आणि आम्ही उद्योगिनी गटाच्या ज्योती दाशरथे, योग थेरेपी सेंटरच्या माध्यमातून अनेकांना योग, प्राणायाम, मेडिटेशन यांचे महत्त्व पटवून उत्तम आरोग्याचे रहस्य प्रदान करणाऱ्या डॉ. चारूलता रोजेकर यांच्या जीवनाविषयी असलेली माहिती वाचनीय आहे.

स्वमग्न मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या आरंभच्या अंबिका टाकळकर, प्राणहिता हेल्थकेअर कॉर्पोरेशन मार्फत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशा जाधव, स्नेहसावलीच्या माध्यमातून निवासी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या शिल्पा आसेगावकर, आईचे लोणचे या खाद्यपदार्थामार्फत ग्राहकांपर्यंत घरची चव पोहोचवणाऱ्या रेखा चव्हाण, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातून उपेक्षित वर्गातील घटकांसाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या डॉ. प्रतिभा पाठक, सगज महिला संघर्ष समितीच्या वतीने महिलांविषयी कार्य करणाऱ्या मंगल खिवंसरा यांचा प्रेरणादायी प्रवास वाचकांना उलघडतो.

दिलासा जनविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामविकासावर काम करणाऱ्या डॉ. अनघा पाटील नवजीवन सोसायटीतून दिव्यांग आणि गतीमंद लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शर्मिला गांधी, उद्यान केअरच्या माध्यमातून गरीब दुर्लक्षित मुलं, महिला आणि तरुणांच्या उत्कर्षासाठी कार्य करणाऱ्या सुधा बजाज, प्रोग्रेस फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑटिझम, अपंगत्व असणाऱ्या मुलांसाठी कार्य करणाऱ्या मधुरा अन्वीकर, फैज ए आम ट्रस्टच्या फारूक परवीन जमाल यांनी दिव्यांग, विधवा, गरजू महिलांसाठी केलेल्या विशेष कार्याची ओळख आपल्याला या पुस्तकाद्वारे होते.

शहरातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘अव्याना’!
भरदिवसा व्यापाऱ्याला लुटणारे जेरबंद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com