यंदापासून परीक्षेला 'होम सेंटर' नसणार!

विद्यापीठाचा निर्णय
यंदापासून परीक्षेला 'होम सेंटर' नसणार!

औरंगाबाद - aurangabad

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) प्रशासनाने पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यंदापासून विद्यार्थ्यांसाठी होम सेंटर (Home Center) नसणार आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश असेल अशा महाविद्यालयापासून १० कि.मी अंतरातील महाविद्यालयामध्ये अल्फाबेटिकल (Alphabetical) पद्धतीने परीक्षा सेंटर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले (Dr.Pramod Yeolale) यांनी दिली आहे.

येत्या १ जूनपासून पदवी तर २१ जूनपासून पदव्युत्तर परीक्षा होणार आहे. या परीक्षेची लगबग सध्या सुरू आहे. परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेतले जात असून प्रश्रपत्रिकांचे काम सुरू आहे. यंदापासून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासन करत आहे.

कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा सेंटरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी जेथे महाविद्यालय तेथे विद्यार्थ्यांची परीक्षा होत होती. परंतु, यंदापासून विद्यार्थ्यांना होम सेंटर नसणार आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश असेल त्या महाविद्यालयापासून १० कि. मी अंतरावर असणाऱ्या महाविद्यालयात अल्फाबेटिकल पद्धतीने परीक्षा सेंटरचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरच परीक्षा सेंटरचे नाव असणार आहे.

कुलगुरू अचानक पोहचणार सेंटरवर

कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी उत्तम निर्णय घेतला आहे. परीक्षेवेळे कुलगुरू स्वत: परीक्षा सेंटरवर पाहणी करणार आहे. कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी कुलगुरूंनी हे प्रयत्न सुरू केले आहे.परीक्षेच्या काळात कुलगुरू परीक्षा सेंटरवर जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

परीक्षा ऑफलाईनच

काही विद्यार्थी संघटनांनी मोर्चाकाढून परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. परंतु, विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षेची संपूर्ण तयारी केली असून आता परीक्षा ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेची तयारी करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. येवले यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com