Happy Friendship Day : मित्र असतो जीव की, प्राण... मैत्रीदिनी आपल्या मित्रांना द्या शुभेच्छा!
नाशिक | प्रतिनिधी Nashik
मैत्रीदिनी (Friendship Day) मैत्रीचे अनेक मेसेजेस सगळ्यांना सतत येत असतात. ‘तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा’. पण मेसेज पाठवणार्या आणि मिळणार्यांमध्ये खूप कमी लोकांच्या नशिबात असे डोळे पुसणारे मित्र असतात. मैत्रीवर अनेक चित्रपट आले तर अनेकांच्या मैत्रीने सातासमुद्रापार नाव रोषण केले. आजच्या मैत्रीदिनी 'देशदूत डिजिटल'वर (Deshdoot Digital) अनेक मित्रांनी आपल्या मित्रांविषयी दोन ओळी लिहिल्या आहेत. कुणी कवीता म्हटल्या आहेत तर कुणी कमी शब्दांत पण अतिशय छान शुभेच्छा दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे देत आहोत....
मैत्री हे निर्मळ पाण्यासारखी असते त्यात तुम्ही जो रंग मिसळाल तशी ती बनते ज्यात कसलंच बंधन नसते असे बंध म्हणजे मैत्री
- मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
मैत्री
तुला मारलेली मिठी
मित्रा सुटायला नको
कुणाच्याही सांगण्याने
मैत्री तुटायला नको
भेदभाव हेवेदाव कधी
भेटायला नको
इथे संशयाचं तळ
मित्रा गाठायला नको
पैसा अडका
श्रीमंती राजा खेटायला नको
स्वार्थ गुंफून नात्यात
मैत्री रेटायला नको
घट्ट धरलेला हात
सैल पडायला नको
क्षण येतील पोरके
कुणी रडायला नको
सौरभ आहेर
9834347833
मैत्री
मैत्री सुखाची सावली...
तिची मनात पालवी..
मैत्री श्रीमंतीचा ओटा...
तिथे प्रेमाला ना तोटा...
रिती मनाची ओंजळ...
मैत्री किती रे सोंज्वळ...
मैत्री अत्तराची कुपी...
भाषा तिची साधी सोपी..
मैत्री आनंदाचा गाव...
तिथे एकेरीच नाव..
मैत्री हास्याचे शिंपण...
तिचे दुःखाला कुंपण...
नसे वयाला बंधन...
मैत्री असे बालपण...
मैत्री हक्काचा जोगवा...
तिचा लटका रुसवा..
प्रतिभा खैरनार नांदगाव जि नाशिक
7319551625
मित्र अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र दैवानेच लाभतात,
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा
कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते
आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मैत्रीणीस रुपाली मॅडम यांस .....
मैत्रीचं ते अनोखे जग
असे मोडणार नाही....
भूतकाळाला वर्तमानापासून
काही केल्या तोडणार नाही….
मैत्री..... खरतर खूप छोटासा शब्द ,परंतु वास्तव्य मात्र विशाल अगदी न मोजता येणार म्हंटल तरी चालेल. आतापर्यंत खूप मित्र भेटले काही आठवणीत राहिले काही या धकाधकीच्या जीवनात हातातून रेती निसटून जावी तसे हळूहळू मनाच्या हळुवार कोपऱ्यातून निसटून गेले. मग भूतकाळाचा आढावा घेतला कि मन स्वतःशीच बोलू लागत, आक्रोश करू लागत परंतु निघून गेलेली वेळ परत येत नाही याचा खरा प्रत्यय तेव्हा येतो.
असच मैत्रीचं अनोखं नातं पुन्हा अनुभवायला मिळालं, मिळतंय...मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो कि, मला तुमच्यासारख्या अनमोल मैत्रिणीची मैत्री अनुभवता येतेय, जगता येतेय, खरतर आपली ओळख जास्त दिवसाची नाही तरीही तुमच्याविषयी मनात एवढी आपुलकी कशी याच उत्तर मलाही शब्दातून व्यक्त करता यायचं नाही. परंतु ठरवून केलेली मैत्री मैत्री कसली, मैत्री तर अशीच होते. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर, विचारावर, आदर्शावर मैत्री म्हणजे काय असं विचारलं तर प्रत्येक जणांची वेगवेगळी मते असू शकतात. काहीजण जयविरु म्हणतील, काहीजण अंदाज अपना अपना म्हणतील तर काहीजण रंग दे बसंती सुद्धा म्हणतील या सगळ्या निस्वार्थ प्रेमरूपी भावनांचं जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं नाव घेतलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटत.
तुमच्याविषयी बोलावं तेवढ कमीच तुमची दुसऱ्याची काळजी करण्याची पद्धत, आपुलकीच बोलणं, कुठलाही स्वार्थ न ठेवता केलेली मदत एखाद्या परकियाला सुद्धा आपलंस केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा ही गोष्ट नक्कीच तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. मैत्रीत स्त्री-पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे असं मला वाटत. तुम्ही नेहमी मित्रांसाठी Power Bank च काम करताना दिसून येता यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणती.......
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
- नितीन आठरे, अहमदनगर
9922252368
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
माझे मित्र म्हणजे एक नाव येतं नाही तर त्या तिघांचं ही नाव येत समीर, विनोद आणि पुरुषोत्तम मला कोणती ही अडचण असेल काही विचारायचं असेल ते मी यांना कधीही आणि कष्यासाठी हि फोन करू शकते. घरातले नाहीत पण घरातल्या पेक्षा कमी ही नहित माझ्या सासरी माहेरी सगळीकडे ते हक्काने येऊन मला विचार पुस करून माझ्या सुखात दुखत आणि प्रत्येक निर्णयात नेहमी माझ्या सोबत असतील आणि असतात.
माझा निर्णय चुकीचा असला तरी मला .... तायडे तुला वाटतंय ना तू बरोबर हे मग कर तू जे करते ते जग काय असं पण नाव शेवटी तस पण नाव ठेवणार हे फक्त नंतर तुला वाईट नाही वाटत पाहिजे की मी ते केलं पाहिजे होत, अस म्हणून मला नेहमी पाठिंबा देणार हे माझे जीव भावाचे जवळचे मित्र एकच नाव नाही घेऊ शकत कारण या तिघांना पण समान किंमत आहे.
- प्रणिता सुर्यवंशी, अहमदनगर
मैत्री हा शब्द खरंतर शब्दाच्या धाग्यात बांधता येईल इतका छोटा नाही. बाकीचे सगळी नाते जन्मतः च आपल्या सोबत आपोआप जोडली जातात. मात्र मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून बनवतो, आणि ते रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनून जात. अनेक प्रकार असतात मैत्रीचे लंगोटी यार, शाळेतला मित्र किंवा मैत्रीण etc.. हो पण अपेक्षा विरहित मैत्री जपणारे फार थोडे असतात. त्या लिस्टमधलं एक जवळच नाव म्हणजे माझा मित्र प्रमोद जगताप. फोन नाही केला तर रुसणारा, त्याच्या घरी लग्नाला नाही गेलं तर एकदम जवळचा होऊन भांडणारा, वाढदिवसाच्या दिवशी न विसरता फोन करून विष करणारा, होऊन नेहमी प्रियंका कशी आहेस हे कॉल करून विचारणारा. आणि हो मुंबईच्या धावत्या आयुष्यात ही प्रत्येक मित्राला वेळ देणारा सखा म्हणजे आमचा प्रमोद. अश्या या हाडाच्या पत्रकाराला मैत्री दिनाच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा..
- प्रियंका ज्ञानदेव पुंड, अहमदनगर
त्रास ठेवतो मनात मी, चेहऱ्यावर दाखवीत नाही,
वाटतो आनंदी सगळ्यांना, पण
मन मित्रा शिवाय कोणी पारखत नाही.
माझ्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
- अब्दुल बेग, अहमदनगर
मैतर, म्हंजी कडाक्याच्या उन्हाळ्यात थंडगार लागणार पानवारा, अन
मैतर म्हंजी अडचणीत घावल्यावर मी तुझ्या संगतीच हाय अशी पाठ थोपटावनारा,
सुखांत माघ, पण दुःखात सगळ्यात पुढं उभं राहणारा, अन
रक्ताच्या नात्याला लाजवंल अस मैत्रीचं नातं निभावणारा,
अशा माझ्या मित्राला मैत्री दिनाच्या शुभेच्छा...
- वंदन जगधने, अहमदनगर
9527142206
ढेकनाचे संगे हीरा जो भंगला ||
कुसंगे नाडला तैसा साधु ||
या तुकोबांच्या ओळीप्रमाणे
माणसाने अविचारी मित्राच्या सानिध्यात राहु नए, अविचारी मित्राच्या सानिध्यात राहिलात तर तुमचा देखील ढेकुन झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणून नेहमी हिर्या सारखे चांगले मित्र निवडा.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा...
- हभप मनु महाराज वाघ, अहमदनगर
8668796663
नातं मैत्रीचं...
सुखदुःखातली सखी
मैत्री असावी आधार
भर उन्हात डोईला
कुणी धरावा पदर.....
नाते रेशमी बंधाचे
त्याची घट्ट व्हावी वीण
हात हातात घेताच
जावा दूर दूर शीण...
गोड मैत्रीच्या नात्यात
नाती अनेक असावी
मायबाप बंधू सखा
सारी तिच्यात दिसावी....
एकाकीपणात मैत्री
अशी असावी हजर
दुरावल्या वासराला
माय दिसावी समोर.....
नसे रक्ताचं तरीही
असे नात्यात गोडवा
नातं मैत्रीचं मोलाचं
त्याला अंतरी मढवा...
©️वंदना गांगुर्डे
नाशिक
मैत्री हे एक असे अनमोल नाते आहे. जे जीवनातील अनेक नात्यांची उणीव भरून काढते. सर्व नात्यांनी साथ सोडली असताना जीवनात एकच असे नाते होते ज्याने जीवणाला आधार दिला जगण्याची शक्ती निर्माण केली संकटांशी लढण्याची प्रेरणा दिली ते नाते म्हणजे आपली मैत्री. माझ्या सुख दूखात माझ्या पाठीशी सदैव माझी ढाल बनुन खंबीरपणे उभ्या राहणारया माझ्या लाडक्या मित्रास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
रोहित धोंड, नाशिक
रक्ताचे नाते आपल्या जन्मानंतर जोडले जाते.
मनाचे नाते दोन व्यक्तींचे मन जुळल्यावर जुळत असते.
पण मैत्रीचे नाते हे असे एकमेव नाते आहे जे कुठलेही जन्माचे,रक्ताचे,मनाचे नाते नसुनही जुळले जाते.
आपले कुठलेही रक्ताचे नाते नसुन माझ्यासोबत मैत्रीच्या एका अतुट बंधनात जुळलेल्या माझ्या सर्व मित्रांना मित्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
बिल्वेश जालिहालकर, नाशिक
हजार मित्र असण्यापेक्षा
असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण
तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
केदार सूर्यवंशी, नाशिक
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…
Happy friendship day
जतीन पुजारी, नाशिक
खरे मित्र कधीच दूर
जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा...
आशिष, दलाल, नाशिक.