लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक

तीन केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सीन
लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक

औरंगाबाद - Aurangabad

लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने वारंवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. महापालिकेला शहरासाठी मिळालेल्या (Covishield) कोविशिल्डच्या 15 हजार लसी दोन दिवसात संपल्या. त्यामुळे उद्या सोमवारी दि.5 जुलै रोजी लसीकरणासाठी पालिकेकडे लस शिल्लक नाही. शासनाकडून पुरवठ्याबाबतही कोणतेच संकेत मिळालेले नाही. त्यामुळे सोमवारी लसीकरण बंद राहील. मात्र कोव्हॅक्सीनचा (Covacin) काही स्टॉक असल्याने तीन केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.

शहरासह जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. दररोज 12 ते 17 हजार दरम्यान लसीकरण होत आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 65 हजार 976 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट 11 लाख 76 हजार 999 इतके देण्यात आले असून उद्दिष्टाच्या सरासरी 39.65 टक्के इतके लसीकरण आजवर शहरात झाले आहे. लसीकरणाला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. मात्र लसी मिळत नसल्यारे पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर (Health Medical Officer Dr. Nita Padalkar) यांनी सांगितले की, पालिकेला प्राप्त झालेली कोविशिल्ड लस संपलेली आहे. आरोग्य विभागाकडे लसीची मागणी केलेली आहे. मात्र अद्याप लसीसंदर्भात कोणताही निरोप मिळालेला नाही. उद्या सोमवारसाठी लस मिळणार नाही. त्यामुळे लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

आता दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांची प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे. नवीन नियमामुळे पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये 84 दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे. दुसरा डोस द्यावा लागणारे नागरिक साधारणपणे 32 हजार इतके आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com