मालवाहु एसटी बसला भरधाव ट्रकची जबर धडक
अन्य

मालवाहु एसटी बसला भरधाव ट्रकची जबर धडक

धडकेत बसचे दोन्ही चालक गंभीर

Ramsing Pardeshi

मलकापुर - Malkapur

शहराबाहेरील नॅशनल हायवे क्र.6 वर जळगांव (खां)कडून शेगांव येथे प्लायवुडचा माल घेऊन जाणार्‍या मालवाहु एस.टी.बस ला नागपुर कडून भरधाव वेगाने मुंबई कडे जाणार्‍या ट्रकने सकाळी दहा वाजेदरम्यान जबर धडक दिली. या धडकेत बसचे दोन्ही चालक गंभीर झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,जळगांव (खां) डेपो ची मालवाहु बस क्र.Mh20 BL347 जळगांव (खां) येथुन प्लायवुड चा माल घेऊन शेगांवकडे जात असतांना हायवे क्रं 6 वर मलकापुर नजीक ओरीसाहुन मुंबई कडे तारबंडल घेऊन जाणार्‍या ट्रक क्र.MH19GE 1723 च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवित मालवाहु बस ला जबर धडक दिली.या धडकेत बस चे चालक रविंद्र काशिनाथ शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर दुसरा चालक रामकृष्ण शिवाजी चखाले दोघे (रा.सावदा) असे बसचे दोन्ही चालक जख्मी झाले अपघाताची माहिती मिळताबरोबर नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ,मनसे (परीवहन) चे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, भा.रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष बंडुभाऊ चौधरी घटनास्थळी दाखल झाले शहर वाहतुक पोलीस कर्मचारी पो.कॉ.आनंद माने,पो.हे.कॉ श्याम शिरसाट,पो.हे.कॉ.गजानन बाढे,पो.कॉ.योगेश तायडे सह उपस्थित नागरीकांच्या सहकार्याने जखमींना डॉ.राहुल चोपडे यांच्या हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल केले,मनसे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांनी बस अपघाताची माहिती मलकापुर आगाराचे आगारप्रमुख दादाराव दराडे यांना देताच त्यांनी आगारप्रमुखांसह मलकापुर डेपोतील कर्मचार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली,ट्रक चालकास ऐ.एस.आय सुरेश रोकडे यांनी ताब्यात घेतले असुन पुढील कारवाई सुरु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com