मोफत टॅली-जीएसटी, सी ट्रिपल प्लस कोर्स

महिलांना होणार फायदा 
मोफत टॅली-जीएसटी, सी ट्रिपल प्लस कोर्स

औरंगाबाद - aurangabad

आनंद एम्पॉवर फाउंडेशन (Anand Empower Foundation) संस्थेतर्फे महिला व मुलींसाठी मोफत टॅली, (gst) जीएसटी व सी प्लस कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिलपासून टॅली सायंकाळी ५ ते ६.३० वाजता, तर सी ट्रिपल प्लस सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेदरम्यान होणार आहे.

करियरच्या उत्तम संधी देण्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आनंदी फाउंडेशन मार्फत विविध कोर्सेस घेतले जाणार आहेत. त्यामध्ये त्यामध्ये टॅली - जीएसटी व सी ट्रिपल प्लस कोर्सचा समावेश आहे. या कोर्सेसमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. हे कोर्स औरंगाबादमधील उल्कानगरी येथील न्यूट्रीफिट क्लिनिकशेजारी मे. पेअर टॉवरसमोर घेतले जातील. यासाठी प्रवेश क्षमता मर्यादित आहेत. ऑफलाइन व ऑनलाइन या मिश्र पद्धतीचा अवलंब करून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

केवळ महिला व मुलींसाठी दहावी उत्तीर्ण आणि वयाची अट १८ वर्षे राहील. कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाईल. अधिक माहितीसाठी ८९७५८५७१५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.