एका वर्षाच्या आतील बालकांना मोफत निमो पोकल लस

खासगीमध्ये एक डोस हजारात
एका वर्षाच्या आतील बालकांना मोफत निमो पोकल लस

औरंगाबाद - Aurangabad

निमोनियामुळे बालकांमधील मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य सरकारने (State Government) महापालिकेला निमो पोकल लस (Nemo pokal vaccine) उपलब्ध करून दिली आहे. वर्षाच्या आतील बालकांना या लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार आहेत. दीड महिन्याच्या बालकास पहिला डोस देण्यास लवकरच सुरूवात होणार आहे.

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर (Medical Officer Dr. Nita Padalkar) यांनी याबाबत सांगितले की, पाच वर्षाखालील बालकांमध्ये निमोनिया होण्याचे प्रमाण सुमारे 12 टक्के इतके आहे. सहा बालकांपैकी एका बालकाचा निमोनियाने मृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या निष्कर्षामधून समोर आले आहे. बालकांमधील मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी निमो पोकल लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. निमो पोकलची दोन हजार लस मिळाली असून त्याचे बालकांना लसीकरण केले जाणार आहे. एका वर्षाच्या आतील बालकांना मोफत निमो पोकल डोस दिले जाणार आहे. दीड महिना, साडेतीन महिने, नऊ महिन्याचे बालक झाल्यानंतर त्यास तीन निमो पोकलचे तीन डोस देण्यात येतील. दीड महिन्याच्या बालकांना डोस देऊन त्याची सुरूवात केली जाणार आहे.

शहरात दीड महिन्याचे साधारणपणे दोन हजार बालके आहेत. या बालकाना मोफत निमो पोकलचा डोस देण्यासाठी दोन हजार लसी मिळालेल्या आहेत. पालिकेच्या 38 आरोग्य केंद्रात डोस देण्याची व्यवस्था केली आहे. लवकरच त्याचा शुभारंभ केला जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले.

खासगी रुग्णालयात निमो पोकल डोस बालकांना देण्यासाठी पैसे मोजावे लागतात. वर्षाच्या आतील बालकांना तीन डोस द्यावे लागत असून एका डोससाठी 5 हजार रूपये मोजावे लागतात. तीन डोससाठी साधारणपणे 15 हजाराचा खर्च येतो, असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खासगीत घेण्यापेक्षा पालिका केंद्रांतच बालकांना लस देणे फायद्याचे ठरेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com