Friday, April 26, 2024
HomeUncategorized३० सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत बूस्टर डोस

३० सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत बूस्टर डोस

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) प्रतिबंधक लसीचा तिसरा अर्थातच बूस्टर डोस (Booster dose) १८ ते ५९ वर्षे वयोगटासाठी सशुल्क केल्याने त्यास मिळणारा प्रतिसाद घटला होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागतात (Central Govt) केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कोरोना प्रतिबंध बूस्टर डोस नागरिकांना मोफत केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून महापालिकेने बूस्टर डोसचे अभियान हाती घेतले आहे.

- Advertisement -

इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली

याअंतर्गत दोनच दिवसांत ३,४४२ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या विविध भागांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतही कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी चिंता वाढवत आहे. औरंगाबाद शहर तर पॉझिटिव्हीटी रेटमध्ये राज्यात दुसर्‍या स्थानी आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा लसीकरणाला देखील प्रतिसाद वाढताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस हा सशुल्क करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद घटला होता. तथापि, कोरोना संसगीची साथ कमी करण्यासाठी पहिला, दुसरा व त्यानंतर बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, वृद्धांनाच मोफत दिला जात होता.

१८ वषषीवरील नागरिकांना हा डोस खासगी रुग्णालयात विकत घ्यावा लागत होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत सवींनाच मोफत बूस्टर डोस देण्याचा निणऱ्य केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने शहरातील ४८ लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी दि.१५ रोजी १,३५८, शनिवारी दि.१६ रोजी २,०८४ जणांनी डोस घेतल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या