बनावट कागदपत्रे ठेवून एसबीआय बँकेची फसवणूक

मॅनेजर, व्हॅल्युअरचे संगनमत 
बनावट कागदपत्रे ठेवून एसबीआय बँकेची फसवणूक
Sandip Tirthpurikar

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


बनावट कागदपत्राच्या आधारावर दोन भूखंड माफिया बिल्डरांनी चक्क अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटची बनावट रजिस्ट्री सादर करून बँक मॅनेजर आणि बँकेच्या व्हॅल्युअरला हाताशी धरून चक्क २८ लाखांचा घोटाळा (fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बॅक (bank) मॅनेजर, व्हॅल्युअरसह दोन बिल्डरविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील फाजलपुरा, दमडीमहल येथील अहमद निजामोद्दीन मोहमद याहिया खान (५९) हे बिल्डर असून त्याचा पार्टनर याहिया खान कैसर खान या दोघांनी दमडी महल येथे अफनान अपार्टमेंट बांधले. तीन मजली इमारतीत त्यांनी सहा फ्लॅट बांधले. सहा फ्लॅट बांधलेले असतानादेखील दोघांनी संगनमत करून आठ फ्लॅट दाखवून त्याची बनावट रजिस्ट्री तयार करून सिडको येथील एसबीआय बँकेत २८ लाख ६७ हजारांसाठी कर्जाचा प्रस्ताव टाकला. बँकेचे तत्कालीन मॅनेजर पहूरकर यांनी प्रकरण बँकेचे व्हॅल्युअर आर्किटेक विनय दिनकरराव गिरधारी यांच्याकडे सोपवला. विनय गिरधारी यांनी कर्ज मंजूर करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा दिला. यावरून बँकेने २८ लाख ६७ हजारांचे कर्ज ६ सप्टेंबर २०१८ दिले. बँकेने कर्ज परतफेडीचा तगादा लावला असता दोघांनी कर्ज फेडले नाही. यावरून बँकेने दोघांना दिवाळखोर घोषित करून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली. 

बिल्डर अहमद निजामोद्दीन मोहमद याहिया खान (५९ ) हे बिल्डर असून त्याचा पार्टनर याहिया खान कैसर खान या दोघांना बँकेने दिवाळखोर घोषित केल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता जप्तीची कारवाईला सुरुवात केली असता त्यांना धक्काच बसला. सहा फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटमध्ये आठ फ्लॅट दाखवून बनावट रजिस्टी आधारे बँकेस गंडा घातल्याचे समोर आले. कर्ज वाटप करताना बँकेचे व्यवस्थापक पहूरकरसह व्हॅल्युअर आर्किटेक्ट विनय गिरधारी यांचादेखील समावेश असल्याचे बँकेच्या तपासणीत उघड झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com