आता 'म्युटेशन'मुळे येणार 'चौथी लाट'

बेधुंद जीवनशैलीला आळा घाला 
आता 'म्युटेशन'मुळे येणार 'चौथी लाट'

औरंगाबाद - aurangabad

मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक हानी पोहोचवणाऱ्या (corona) कोरोना महामारीने अख्खे जग हादरले असून गेल्या दोन वर्षात आपल्या देशात कोरोनाच्या तीन लाटी आल्या. तिसरी लाट जरी पूर्णतः ओसरली असली तरी कोरोना संपला असा गैरसमज करून लोक बेधुंदपणे वावरत आहेत. विनामास्क (Mask) फिरणाऱ्यांचे प्रमाण या दिवसात बरेच वाढले असून एप्रिलच्या अखेरीस भारतात कोरोनाची चौथी लाट सक्रिय होण्याचा धोका आहे.

युरोपातील (Europe) अनेक देशांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसत आहे. ओमायक्राॅनच्या (Omycran) म्युटेशनचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर (maharastra) महाराष्ट्रात सतर्कता बाळगली जात आहे. (Department of Health) आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांनी राज्यभरातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेअखेर चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण व बळींची संख्या कमालीची घटत असली तरी लसीकरणाचे उद्दिष्ट मात्र पूर्ण झालेले नाही. त्यामुळे निर्बंध कायम आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोलाईत यांनी सांगितले की, आरोग्य आयुक्तांनी मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यापुढेही हात धुणे, गर्दी टाळणे व मास्क वापरणे बंधनकारक आहे.

रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांनी नियम पाळणे बंद केले आहे. गर्दीत लोक विनामास्क सर्रास फिरत आहेत. सभा, समारंभाला आता गर्दीचे बंधन राहिले नसल्याने खूप गर्दी होते, तिथेही क्वचितच लोक मास्क वापरताना दिसतात. अशा बेफिकिरीने वागल्यास आपण स्वत:हून संकट ओढवून घेऊ, अशी भीती तज्ज्ञांना वाटते.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 744 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा (01)

टि.व्ही.सेंटर 1,

ग्रामीण (02)

पैठण 1, गंगापूर 1

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com