वैजापूरचे माजी आमदार आर.एम.वाणी यांचे निधन 

शिवसेनेचे मोठे नुकसान
वैजापूरचे माजी आमदार आर.एम.वाणी यांचे निधन 

औरंगाबाद - Aurangabad

शिवसेना नेते व वैजापूरचे (Former MLA R. M.Vani) माजी आमदार रंगनाथ मुरलीधर ऊर्फ आर. एम. वाणी (84) यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) निधन झाले. त्यांनी 1999 ते 2014 या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने प्रतिनिधित्व केले.

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आर.एम. वाणी या नावाने सुप्रसिद्ध असेलेल्या वाणी यांनी 1984 ते 1994 या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भूषवत राजकीय कारकिर्दीत आर. एम. वाणी यांनी शहरासह ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले. नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग 39 दिवस आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनावर त्यांचा चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

वैजापूर येथील येवला रोडवरील निवासस्थानी अंत्यदर्शनानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्ययात्रा निवासस्थानाहून येवला रोड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - संकट मोचन हनुमान मंदिर - टिळक रोड - जामा मस्जीद - पाटील गल्ली मार्गे वैजापुर अमरधाम या मार्गे काढण्यात आली होती. येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यासह अनेक ठिकाणहुन विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, प्राध्यापक, व्यावसायिक, शिक्षक, पत्रकार, डॉक्टर मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com