ऑक्सिजनसाठी केवळ 'डिस्टील्ड वॉटर'चाच वापर करा

महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
ऑक्सिजनसाठी केवळ 'डिस्टील्ड वॉटर'चाच वापर करा

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनातून बरे झाल्यावर काही जणांना म्युकरमोयकोसिस आजार (बुरशीजन्य आजार) होत असल्याचे लक्षात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा वापर केला जातो. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनसाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्यांमध्ये केवळ 'डिस्टील्ड वॉटर'चाच वापर करा. त्यामुळे म्युकरमायकोसिसचा आजार टाळणे शक्य होईल, असे पत्र महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना पाठवले आहे.

औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिस आजाराचे चिंता निर्माण केली आहे. या आजाराचे २०१ रुग्ण दाखल असल्याचे पालिकेने गेल्या आठवड्यात जाहीर केले आहे. त्यापैकी सोळा जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

म्युकरमायकोसिस आजाराबद्दल महापालिकेने तज्ज्ञांशी चर्चा करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यातील एक निष्कर्ष पाण्याच्या संदर्भातील आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा वापर केला जातो.

ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बाटलीत 'डिस्टील्ड वॉटर' भरणे गरजेचे असते पण बहुतेक रुग्णालयात साधे पाणी वापरले जाते. बाटल्यांमध्ये साधे पाणी न वापरता 'डिस्टील्ड वॉटर'च वापरा असे आदेश देणारे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांना पाठवले आहे.

पत्रात म्हटले आहे की, रुग्णालयातील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या बाटल्यांची रोज स्वच्छता करावी. या बाटल्या गरम पाण्याने धुवाव्यात. बाटल्यांमध्ये साधे पाणी न टाकता 'डिस्टील्ड वॉटर'च टाकावे. बाटल्यांमधील पाणी बदलण्यात आल्याची तारीख बाटल्यांवर लिहावी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com