Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedअन्नधान्य साठेबाजीवर नियंत्रण आणावे-अप्पर जिल्हाधिकारी

अन्नधान्य साठेबाजीवर नियंत्रण आणावे-अप्पर जिल्हाधिकारी

औरंगाबाद – aurangabad

पुरवठा विभागाने (Supply department) नागरिकांना मुबलक प्रमाणात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अनधिकृत (Biodiesel) बायोडिझेल निर्मिती-विक्री करण्याऱ्यावर महसूल व (police) पोलिस प्रशासनानी कारवाई करावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी (Collector) डॉ.अनंत गव्हाणे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले.

- Advertisement -

बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे एस.एस. बनसोडे व पोलिस उपधिक्षक प्रकाश चौगुले, तसेच सामितीचे इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य, पेट्रोल व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सूरळीत व रास्त भावात उपलब्ध व्हावा यासाठी खाजगी वखारात होणारा अनाधिकृत अन्नधान्य साठा बाबत विभागाच्या अधिकांऱ्यानी तपासणी करावी व साठेबाजी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय व वैश्या व्यवसायातील महिलांसाठी शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करावी. वंचित व गरजू व्यक्तीना लाभ मिळावा यासाठी सर्व रास्त भाव दुकानदार यांच्या मार्फत समाजातील दिव्यांगाना, अनाथ, तृतीयपंथीय यांना अन्न धान्य मिळणासाठी शिधापत्रिका वाटप करावे. यासाठी विशेष मेळावा व इतर उपक्रमातून संबंधिताना लाभ मिळवून देण्याचे निर्देश डॉ. गव्हाणे यांनी दिेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या