सावधान ; ड्रिंक करून बस चालवल्यास बडतर्फी!

राज्यभरात कारवाईचे निर्देश 
सावधान ; ड्रिंक करून बस चालवल्यास बडतर्फी!

औरंगाबाद - aurangabad

दारू पिऊन (drinking) वाहन चालविणे (Driving) हा कायद्याने गुन्हा आहे. हा नियम एसटी बसच्या (s t bus) चालकांनाही लागू पडतो. असे असले तरी अनेक वेळा दारू पिलेल्या अवस्थेत चालक आढळले आहेत. बस चालकांची ब्रेथ अनालायझर यंत्राव्दारे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या चालकांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. असे वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी (maharastra) राज्यातील सर्व आगार प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात सूचित केले आहे.

सावधान ; ड्रिंक करून बस चालवल्यास बडतर्फी!
आता हजार लिटर पाण्याला मोजा १४३ रुपये!

एसटी महांमडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दहा जून रोजी आगार प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, बस चालकाने दारू 'पिलेली नाही, या बाबीची खात्री करूनच त्याच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग द्यावे, तसेच मार्ग तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी ब्रेथ ऑनालायझर यंत्राव्दारे अचानक तपासणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. बस चालक मद्य प्रशासन केलेला असेल, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी चालकाच्या ताब्यात बस देणाऱ्यापासून ते आगारप्रमुखांची राहील.

बस चालकाने दारू पिलेली नाही, याबाबत खात्री करूनच बस चालकांच्या ताब्यात बस देऊन ती मार्गस्थ कराबी, चालक दोषी आढळल्यास त्याची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून पोलिसात तक्रार करून पुढील कारवाई करावी. ज्या आगारात ब्रेथ ऑनालायझर यंत्र उपलब्ध आहे, त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगाराच्या मार्गस्थ होणाऱ्या बस चालकांचे विशेषतः लांब पल्याच्या व रातराणी बसेसच्या चालकांची तपासणी करून त्याची स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी. बस चालक दोषी आढळल्यास बडतर्फीची कारवाई होणार आहे याबाबतची माहिती त्या बस चालकाला द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com