‘जलयुक्त’ची कामे थांबवल्याने आला 'महापूर'

देवेंद्र फडणवीसांचा आरोप  
‘जलयुक्त’ची कामे थांबवल्याने आला 'महापूर'

औरंगाबाद- Aurangabad

 महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवाराचे काम थांबवल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात मराठवाड्याच्या काही भागांत पाणी साचले, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी दौतपूर आणि इर्ला गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

जलयुक्त शिवारअंतर्गत अशास्त्रीय कामे करण्यात आल्याचा दावा पर्यावरण आणि जलव्यवस्थापन तज्ज्ञांनी नुकताच केला होता. नद्यांच्या थोड्या प्रमाणातील खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे अनेक भागांत पाणी साचणे थांबले आहे.

या सरकारने ही योजना स्थगित केली आणि खोलीकरण व रुंदीकरणाचे काम थांबवले आहे, ज्यामुळे पाणी साचले, या महत्त्वाच्या बाबीकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले, असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसोबतच्या संवादाचा व्हिडीओ फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे.

Related Stories

No stories found.