Monday, April 29, 2024
HomeUncategorizedस्वतःच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी

स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद – aurangabad

स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला (Pokso Act) पोक्सो कायद्यान्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास वेगवेगळ्या कलमानुसार दीड महिना कारावास अशी शिक्षा विशेष न्यायधीश ए. एस. खडसे (Judge A.S. Khadse) यांनी सुनावली.

- Advertisement -

मुकुंदवाडीतील (Mukundwadi) एका ३५ वर्षीय महिलेने ६ सप्टेंबर २०२० रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार महिला, तिचा पती व सतरा वर्षीय मुलगी आणि मुलगा किरायाच्या घरात राहत होते. मोलमजुरी करणारा पती दारूच्या नशेत स्वतःच्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता. मुलीच्या आईला पॅरालिसिस झालेला असल्याने असहायतेचा गैरफायदा घेत तो रात्री लाइट बंद करून मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असे. ४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री आरोपीने मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यामुळे महिलेने ६ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक बी. डी. कोपनर यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सहायक सरकारी वकील राजू एस. पहाडिया यांनी सात जणांच्या साक्षी नोंदवल्या. सुनावणीनंतर भादंवि ३५४ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, पोक्सो कलम ७, ८ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधा कारावास तसेच पोक्सो कलम ९, १० नुसार पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तसेच पोक्सोच्या कलम ११, १२ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा एकत्रित भोगावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या