औरंगाबादेत म्यूकरमायकोसिसने आणखी पाच रुग्णांचा मृत्यू

नव्याने 23 रुग्ण दाखल
औरंगाबादेत म्यूकरमायकोसिसने आणखी पाच रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद - Aurangabad

शहरात म्युकरमायकोसिस हा फंगल इन्फेक्शन आजार देखील आता गतीने पसरू लागला आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या आणखी पाच जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर दिवसभरात नव्याने 23 रुग्ण उपचारासाठी वेगवेगळया रुग्णालयात दाखल झाले आहेत. शहरात मागील चार दिवसात 19 जणांचा बळी गेल्याने चिंता वाढली आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनापाठोपाठ म्यूकरमायकोसिसचा आता धोका निर्माण झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्यूकरमायकोसिसचा आजार होण्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर नियोजन केले जात आहे. मात्र हा आजार झपाट्याने पसरत चाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

बुधवारी सहा जणांचा म्यूकरमायकोसिसच्या आजाराने मृत्यू झाला असून गुरुवारी पाच जण तर शुक्रवारी तीन जण दगावले. आज शनिवारी आणखी पाच जणांचा बळी गेल्याने आतापर्यंत मृत्यूची संख्या 75 वर पोहचली आहे. तर मागील चार दिवसात 19 जणांचा मृत्यू झाल्याने या आजाराची तीव्रता वाढत चालली असून म्युकरमायकोसिसने फास आवळण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी दगावलेल्या पाचपैकी तीनजण खासगी रुग्णालयात, तर दोघांचा सरकारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. म्यूकरमायकोसिसच्या आजाराचे शहरात रुग्ण कमी असले तरी ग्रामीण व बाहेरच्या जिल्ह्यातून हे रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत.

शनिवारी म्यूकरमायकोसिसचे नव्याने 23 रुग्ण दाखल झाले. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 248 वर झाली आहे. यात घाटी रुग्णालयात सर्वाधिक 78 रुग्ण दाखल आहेत. एमजीएम 71, एमआयटी 99 इतक्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.