कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग : लसीकरण नसणाऱ्यांनाही पेट्रोल देणारा पंप सील

कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग : लसीकरण नसणाऱ्यांनाही पेट्रोल देणारा पंप सील

औरंगाबाद – aurangabad

'नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल' या नियमाला डावलणाऱ्या पेट्रोल पंपावर तपासणी केली असता शहरातील बाबा पेट्रोल पंपवरील कर्मचारी कुठलीही पडताळणी न करता पेट्रोल देताना आढळून आले. हा पेट्रोल पंप प्रशासनाने सील केला आहे.

कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग : लसीकरण नसणाऱ्यांनाही पेट्रोल देणारा पंप सील
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

जिल्ह्यात लसीकरणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते.

या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा (No Vaccination, No Petrol) या आदेशाचा भंग केल्याचे, मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे, अशा गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सोनाली जोंधळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व राजेंद्र शिंदे जिल्हा पुरवठा निरीक्षक औरंगाबाद यांनी बाबा पेट्रोल पंप सील केलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com