फटाके, मिठाईने गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

महिला मंडळांचा उपक्रम
फटाके, मिठाईने गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

औरंगाबाद - aurangabad

दिवाळी (diwali) निमित्त आपल्या आनंदात उत्सवात गरजू आणि गोरगरिबांना समाविष्ट करण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. विविध संस्था, संघटना, महिला मंडळांनी दिवाळीनिमित्त गरजूंना मदतीचा हात देत आपला आनंद द्विगुणित केला.

फटाके, मिठाईने गरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

शहरातील बीड बायपास, जळगाव रोड, विद्यापीठ परिसर, बेगमपुरा, सातारा परिसर, पैठण रोड, जालना रोड या भागात राहत असणाऱ्या गरजूंपर्यंत महिलांनी सर्व साहित्याचे किट दिवाळीच्या चार दिवस आधी पोहोचवले तसेच वृक्षारोपण देखील केले. या उपक्रमात पद्मा तापडिया, किरण भट्टड, पुष्पा लड्डा, पुष्पा मणियार, विजया काबरा, मीरा तोतला, विजया तापडिया, साक्षी मालू यांनी यांनी सहकार्य केले. प्रकल्पाची सुरुवात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आली.

पद्मा तापडिया यांनी आपल्या मित्र परिवारासह शहरातील सुमारे पाचशेपेक्षा अधिक गरजू महिलांना साड्या ,मिठाई, फराळाचे पदार्थ, फटाके, आकाश कंदिल, काही रोख रक्कम देऊन दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com