अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल

नोंदणीच्या व्यवहारांना मान्यता
अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल

औरंगाबाद - aurangabad

गेल्या अकरा महिन्यांपासून ठप्प पडलेले खरेदीखत नोंदणीचे (Purchase deed registration) व्यवहार आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Aurangabad Bench) औरंगाबाद खंडपीठाचे (Justice) न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांनी शासनाचे १२ जुलैचे तुकडाबंदीचे परिपत्रक व महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ चे नियम क्रमांक ४४ (५) (ई) रद्द केले आहेत.

अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल
विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोन वृद्धींगत करावा-जयदेव डोळे

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडाबंदीचे परिपत्रक व नियम जारी केल्यामुळे एनए-४४ (अकृषी जमिनी / नॉन-ऑँग्रिकल्वर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री बंदच आहे. परिणामी हवाला पद्धतीसारख्या मुद्रांकावर (बॉण्ड) मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा सपाटा सुरू असतानाच खंडपीठाने हा आदेश दिला आहे. प्लॉटिंग व्यावसायिक याचिकाकर्ते गोविंद सोलापुरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा पवार (रा. करोडी, औरंगाबाद) यांनी त्यांच्या ग्राहकांना विकलेले भूखंड, रो हाऊसेस, इ.बाबत दुय्यम निबंधक कार्यालयात वेगवेगळे खरेदीखत नोंदणी करण्यासाठी गेले असता त्यांचे खरेदीखत न नोंदविता याचिकाकर्त्यांना परत दिले. वरील परिपत्रक आणि नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणल्याशिवाय खरेदीखत नोंदवण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले. म्हणून त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अँड, रामेश्‍वर तोतला यांनी काम पाहिले, त्यांना अँड. राहुल तोतला, अँड. रिया जरीवाला, अंड. स्वणिल लोहिया, अँड.रजत मालू आदींनी सहकार्य केले.

अशा होत्या तरतुदी

1) एखाद्या सव्हे नंबरच क्षेत्र २ एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा विकता येत येत नाही, त्याची रजिस्ट्री देखील होत नाही. जमिनीचे अधिकृत आउट करून घेतले तरच रजिस्ट्री होईल.

2) प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीची आवश्यकता असेल.

3) एखाद्या जागेच्या तुकड्याचा (Department of Land Records) भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील, अशी तरतूद आहे.

Related Stories

No stories found.