अखेर महापालिकेच्या इमारतीवरील 'औरंगाबाद' काढले

प्रशासनाची कारवाई
अखेर महापालिकेच्या इमारतीवरील 'औरंगाबाद' काढले

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar

केंद्र व राज्य शासनाने (Central and State Govt) शहराचे नामकरण (Naming of the city ) छत्रपती संभाजीनगर करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिकेने (Municipal Corporation) सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारासह मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीनच्या इमारतीच्या नामफलकावरील (nameplate) 'औरंगाबाद' हे नाव हटविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या निर्णयाची तातडीने महानगरपालिकेने अंमलबजावणी सुरू केली. परंतु मनपा प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीनच्या इमारतीवरील औरंगाबाद महापालिका हे नाव हटविण्यात आले नव्हते. महानगरपालिकेचे प्रवेशद्वारासह इमारतीच्या नामफलकावरील 'औरंगाबाद' हे नाव हटविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. आभिजित चौधरी यांनी तातडीने नामफलकावरील 'औरंगाबाद' हे नाव हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीन इमारतीच्या नामफलकावरील 'औरंगाबाद' हे नाव काढून टाकण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com