कचऱ्यामध्ये आढळले जिवंत काडतुस

या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कचऱ्यामध्ये आढळले जिवंत काडतुस

औरंगाबाद - Aurangabad

आकाशवाणी (All India Radio) समोर साफसफाई करत असताना मनपा कर्मचाऱ्याला प्लास्टिकच्या पिशवीत (Plastic bag) बंदुकीच्या पंधरा गोळ्या आढळल्या. याप्रकारणी जिन्सी पोलिस (Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना रोडवरील आकाशवाणी समोरील संत एकनाथ सोसायटीतील प्लॉट क्रमांक 5 जवळ एका ठिकाणी मनपा कर्मचारी संतोष चाबुकस्वार हे साफसफाई असतांना त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 15 बंदुकीच्या गोळ्या आढळल्या. हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 12 बोरचे 2 नग आणि 22 पॉइंटचे 13 नग अशा एकूण पंधरा गोळ्या आढळल्या. त्यानंतर विनापरवाना बंदुकीच्या गोळ्या बाळगून जाणीवपूर्वक सार्वजनिक रस्त्यावर टाकून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com