२५ वऱ्हाडींची संख्या ओलांडल्याने माजी आमदारावर गुन्हा दाखल

लॉन्सचालकाला ५० हजारांचा दंड 
२५ वऱ्हाडींची संख्या ओलांडल्याने माजी आमदारावर गुन्हा दाखल

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळींत 25 जणांची परवानगी दिलेली आहे. असे असतानाही गारखेडा भागातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी आमदारांच्या मुला-मुलीच्या विवाहात नियमांचा भंग करण्यात आला. त्यावरून चिकलठाणा पोलिसांनी चितेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्सच्या मालकासह वधूपित्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय लॉन्स मालकाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चितेपिंपळगाव येथील बागडे पाटील लॉन्समध्ये गारखेडा भागातील प्रतिष्ठित नागरिक गणेश भारत चौधरी यांच्या मुलीशी पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाचा लग्न सोहळा सुरू होता. या लग्न समारंभात 25 पेक्षा जास्त व-हाडींची उपस्थिती होती.

याबाबतची माहिती मिळाल्यावरुन चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी कर्मचा-यांसह धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी लॉन्स मालक प्रल्हाद कडूबा बागडे आणि आयोजक वधू पिता गणेश चौधरी यांना ताब्यात घेतले. चितेगाव ग्रामपंचायत कोविड-19 चे समिती सदस्य पांडूरंग सजेर्राव सोनवणे यांच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लॉन्स मालक प्रल्हाद बागडे यांना 50 हजारांचा दंड आणि नोटीस बजावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com