Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमूळ उत्तरपत्रिका 'कार्बन कॉपी'सह दाखल करा-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

मूळ उत्तरपत्रिका ‘कार्बन कॉपी’सह दाखल करा-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद – aurangabad

याचिकाकर्ती विद्यार्थिनी अश्विनी मनमोहन आचारी हिची ‘नीट’ परीक्षेची गुणपत्रिका, मूळ उत्तरपत्रिका ‘कार्बन कॉपी’सह संपूर्ण मूळ रेकॉर्ड १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता औरंगाबाद खंडपीठात दाखल करावी, असे आदेश न्यायमूर्ती रवींद्र युगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी सुनावणीवेळी व्यक्तिश: हजर राहणे खंडपीठाला अपेक्षित आहे.

- Advertisement -

नीट परीक्षेच्या निकालात आदर्श नमुना उत्तरपत्रिकेनुसार ६३४ गुण मिळणे अपेक्षित असताना याचिकाकर्तीला केवळ २१८ गुणच देण्यात आल्यामुळे दाखल
याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने हे आदेश दिले. नीट परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका डाऊनलोड करून ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पाठवायची असते. त्याचवेळी सदर एजन्सीकडून विद्यार्थ्यांना आदर्श अचूक उत्तरपत्रिका देखील पुरवली जाते. विद्यार्थ्यानी भरलेली उत्तरपत्रिका एजन्सी विद्यार्थ्याना मेल करते व मूळ उत्तरपत्रिका एजन्सीकडेच असते. तिची प्रत विद्यार्थ्याना पाठविली जाते. एजन्सीकडून पाठविलेल्या उत्तरपत्रिकेतील अचूक उत्तरे व विद्यार्थ्याने लिहिलेली उत्तरपत्रिका यांचे तुलनात्मक निरीक्षण केल्यास किती संभाव्य गुण मिळतील, हे अचूक कळते. अश्विनीला एजन्सीकडून पाठवण्यात आलेल्या उत्तरांची तुलना तिच्या उत्तरपत्रिकेशी केली असता, तिला ७२० पैकी ६३४ गुण मिळणे अपेक्षित होते.

मात्र, ८ सप्टेंबर रोजी अश्विनीला स्कोअर कार्ड मिळाले. त्यात तिला २१८ गुण मिळाले. अश्विनीने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलद्वारे ही बाब कळविली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अश्विनी हिने अँड. विनोद पाटील यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. सुनावणीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे वकील गायकवाड यांनी न्यायालयाकडे २ दिवसांचा अवधी मागितला होता. त्यामुळे या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. अँड. विनोद पाटील यांना अँड. राहुल सावळे, अँड. मदन खानसोळे, अँड. प्रतिभा चौधरी व अँड. ओमप्रकाश सुकेवार साहाय्य करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या