शिवराज पाटलांवर गुन्हा दाखल करा-विहिंपची मागणी

शिवराज पाटलांवर गुन्हा दाखल करा-विहिंपची मागणी

औरंगाबाद - aurangabad

सातत्याने वादात सापडणाऱ्या शिवराज पाटील (Shivraj Patil) चाकूरकर यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होणार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. 

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना 'जिहाद'हा केवळ कुराणातच आहे असे नाही तर महाभारतातही आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यासाठी जो उपदेश केला तो जिहादच होता', असे पातळी सोडून वक्तव्य केले. यातून हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ भगवद्गीतेचा अपमान केल्याचा आरोप करून देवगिरी प्रांत विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच  चाकूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की शिवराज पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत भरपूर अधिकार मिळाले; पण एकही विधायक कार्य त्यांनी केले नाही. आयुष्यभर त्यांनी गांधी-खान घराण्यांची भलावण केली. संविधानात कोणत्याही धर्माच्या देवीदेवतांचा अपमान हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. पाटील यांनी तर पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीतेचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी विश्‍व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे आणि प्रांतमंत्री योगेश्वर गर्गे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com