राज्य अंधारात जाण्याचा भीती; दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

राज्य अंधारात जाण्याचा भीती; दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

औरंगाबाद - aurangabad

राज्याला वीज पुरविणाऱ्या महानिर्मितीच्या (Mahanirmiti) सर्व 7 औष्णिक वीज (power station) केंद्रांमध्ये अवघा दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे दैनंदिन आवश्यक कोळसा पुरवठा न झाल्यास संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडून, राज्य अंधारात जाण्याचा भीती व्यक्त होत आहे.

महानिर्मितीच्या नाशिक, परळी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, पारस आणि कोराडी (Nashik, Parli, Khaparkheda, Chandrapur, Bhusawal, Paras and Koradi) या सात वीज प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता 7700 मेगावॅट आहे. एकूण क्षमतेच्या जवळपास 75 ते 80 टक्के वीज या केंद्रात तयार होते. त्यासाठी रोज जवळपास 80 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.

औष्णिक वीज केंद्रातून अखंड वीजनिर्मितीसाठी किमान 15 दिवसांच्या कोळशाचा साठा असायला हवा. कोळशाचा साठा 10 दिवसांपेक्षा कमी असल्यास क्रिटीकल, तर पाच दिवसांपेक्षा कमी झाल्यास सुपर क्रिटीकल परिस्थिती समजली जाते. मात्र, सध्या त्यापेक्षा बिकट अवस्था आहे.

फक्त दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा

महानिर्मितीकडे सध्या केवळ दीड दिवस पुरेल, एवढाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळे मिळेल तितक्या कोळशावर 5 हजार मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती केली जात आहे. मात्र, कोळसा मिळण्यात खंड पडल्यास संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता असल्याचे संचालक (कोळसा) पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.