शेतकऱ्यांना सरसकट ५० हजाराची मदत द्या!

मनसेची मागणी
शेतकऱ्यांना सरसकट ५० हजाराची मदत द्या!

औरंगाबाद - Aurangabad

(State Government) राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आलेल्या आदेशाचे पालन करत आज औरंगाबादमधील जिल्हाअध्यक्ष सुहास दाशरथे व शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात द्यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, पूर्व विभाग अध्यक्ष अशोक पवार, चंदू नवपूते, नीरज बरेजा, बाबूराव जाधव, युवराज गवई, दीपक पवार, संघपाल जाधव, संतोष कुटे, किरण गवई, रामकृष्ण मोरे, राहुल कुलकर्णी व इतरही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com