Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedशेतकऱ्यांनो, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी

शेतकऱ्यांनो, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी

औरंगाबाद – Aurangabad

राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मात्र या नैसर्गिक आपत्तीला न डगमगता शेतकरी बांधवांनी धैर्याने तोंड द्यावे. आपल्या पाठीशी शिवसेना सदैव उभी आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) वारंवार आढावा घेऊन मदत करण्याची सूचना प्रशासनाला देत आहे. त्यामुळे कधीही हक्काने आवाज द्या, आम्ही मदतीला धावत येऊ, अशी ग्वाही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Shiv Sena leader Chandrakant Khaire) यांनी दिली. कन्नड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले.

- Advertisement -

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी याबाबत चर्चा करून कन्नड तालुक्यासह संभाजीनगर जिल्ह्यात तातडीने सर्व पंचनामे करण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावात शेती पिकासह अनेक पाळीव जनावरे, घरे व शेतीसाहित्य वाहून गेले आहे याचीही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. याचा मोठया प्रमाणात फटका कन्नड तालुक्यात देखील बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नाले खोलीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्ती करण्याची सूचना देण्यात आली. या पाहणीदरम्यान करंजखेड, तलावाडी, चिंचोली, शेलगाव, टाकळी, देवपूर, वाकी, घाटशेंद्रा, पिशोर आदी गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, तालुका संघटक अण्णासाहेब शिंदे, युवासेना तालुका अधिकारी राहुल वळवळे, उमेश मोकासे, उप तालुकाप्रमुख संजय पिंपळे, विभाग प्रमुख अनिल चव्हाण उप विभागप्रमुख, बाबुराव सोनवणे, रामेश्वर ताजने, शाखा प्रमुख प्रकाश सोनवणे, विठ्ठल मनगटे, विलास पवार आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या