Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedचक्क आरटीओ निरीक्षकाला दिले बनावट लायसन्स!

चक्क आरटीओ निरीक्षकाला दिले बनावट लायसन्स!

औरंगाबाद – aurangabad

आरटीओ कार्यालयात (RTO Office) येणारी गर्दी कमी व्हावी या उद्देशाने शासनाने घरबसल्या शिकाऊ उमेदवारांना लर्निंग लायसन्स (Learning License) मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा गैरफायदा घेत शहरातील (Driving school) ड्रायव्हिंग स्कूल चालकाने आरटीओ कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकाला (Motor Vehicle Inspector) बोगस लायसन्स दिल्याचा प्रताप आरटीओच्या स्टिंग ऑपरेशननंतर समोर आले आहे. या प्रकरणी बोगस लायसन्स देणाऱ्या श्री गणेश ड्रायव्हिंग स्कूलचा चालक किरण दळवी याच्या विरोधात सिडको (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील ड्रायव्हिंग स्कूलचा दर्जा खालावत आहे. या अनुषंगाने राज्यभरातील ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी मोहीम राबविण्यात आली. औरंगाबाद शहरात बीडच्या मोटारवाहन निरीक्षकांकडून ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्यासह अन्य पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. गणेश विघ्ने हे वेशभूषा बदलून डमी उमेदवार बनून औरंगाबाद शहरातील विविध भागातील ड्रायव्हिंग स्कूलवर अचानक तपासणीसाठी गेले. सिडको येथील श्री गणेश ड्रायव्हिंग स्कूलवर गेल्यानंतर त्यांनी लर्निंग लायसन्स काढून देण्याबाबत संबंधिताला सांगितले. त्याने चार हजारात लर्निंग लायसन्स काढून दिले. गणेश विघ्ने यांनी बीड येथे कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर अस्वले यांचा आधार कार्ड दिला. आधार कार्डबरील व्यक्ती कोण आहे याची तपसाणी न करताच संबंधित ड्रायव्हिंग स्कूलच्या कर्मचाऱ्याने मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांचा ऑनलाईन अर्ज भरला, ऑनलाईन फिस भरली. तसेच ओटीपीच्या आधारे अस्वले यांच्या आधार कार्डावर गणेश विघ्ने यांना लर्निंग लायसन्स काढून देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष म्हणजे लर्निंग लावसन्सची ऑनलाईन प्रक्रिया करताना, प्रत्येक उमेदवाराला लर्निंग टेस्ट देणे बंधनकारक असते. मात्र, श्री गणेश ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकाने गणेश विघ्ने यांना ऑनलाईन परीक्षेसाठी न बसविता स्कूलच्या कर्मचाऱ्यांकडून परीक्षा देऊन त्यांचा लर्निंग लायसन्स काढून दिला.

विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी ज्ञानेश्वर अस्वले यांचा आधार कार्ड वापरण्यात आला होता. सदर व्यक्ती हा बीड येथे कार्यरत असताना त्याच्या आधार कार्डावर गणेश विघ्ने यांना लर्निंग लायसन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी बीड आरटीओ निरिक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून श्री गणेश ड्रायव्हिंग स्कूलचे किरण पंढरीनाथ दळवी याच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक डोईफोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या