तरुणीच्या नावाने बनावट कॉलगर्ल प्रोफाईल

औरंगाबाद – aurangabad

लग्राचा प्रस्ताव (proposal) नाकारल्याने तरुणीचे कॉलगर्ल नावाने (Fake Facebook) बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करुन तरुणीची बदनामी केली.याप्रकरणी (Cyber ​​Police) सायबर पोलिसांना आलेल्या तक्रारीवरुन (mp) मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आसाराम बापुंच्या गुरुकुल येथे आचाऱ्याचं काम करणार्‍या तरणाला पोलिसांनी अटक केली. गोविंद राजेंद्र नाईक (३६, मुळ रा. ओरीसा) (Orissa) असे आरोपीचे नाव आहे.

गोविंद हा गजानन महाराज मंदिराजवळ (Gajanan Maharaj Temple) आसाराम बापुंच्या (Asaram Bapu) साहित्याची विक्री करतो. यावेळी ग्राहक असलेल्या २६ वर्षीय तरुणीशी त्याची ओळख झाली. गोविंद याने तरुणीला लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र मुलीने लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला. २० ऑगस्ट २०२१ रोजी गोविंद नाईक याने पीडित महिलेचा मोबाईल क्रमांक हा बनावट फेसबुक प्रोफाईलवर करावे अशा आशयाची माहिती अपडेट केली. त्याचा फायदा घेवून अनेकांनी पीडित महिले सोबत अश्लील चॅटींग केली. या प्रकारामुळे महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेर तिने

सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखळ करण्यात आला होता. दरम्यान, सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तेव्हा आरोपी हा मुळ ओरीसा राज्यातील असून तो अल्पशिक्षित असल्याचे समोर आले. तसेच सध्या तो सध्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आसाराम बापु आश्रमच्या गुरुकुलमध्ये अन्न बनवण्याचे काम करत आहे. त्यावरून सायबर पोलिसांच्या पथकाने छिंदवाडा येथे जाऊन आरोपी गोंविद नाईक याला स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.