बनावट जन्मदाखला ; अटकपूर्व जामीन फेटाळला

सैन्य भरती प्रकरण
बनावट जन्मदाखला ; अटकपूर्व जामीन फेटाळला

औरंगाबाद - aurangabad

बनावट जन्म दाखला (birth certificate) सादर करून सैनिक भरतीत (Soldier recruitment) सहभाग घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी प्रशांत रामचंद्र महाले याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व (Sessions Judge) सत्र न्यायाधीश एस. एस. मौदेकर यांनी नुकताच फेटाळला.

या प्रकरणात कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (वय ४०) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, जळगाव, बीड व लातूर या विभागांचे सैन्य अधिकारी म्हणून जमवाल काम पाहतात. २०१६ ते २०२० या काळात वरील विभागात लष्कर भरती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी जालना येथील २०१७ च्या भरती प्रक्रियेत विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), जळगाव येथील २०१८ च्या भरती प्रक्रियेत शंकर सुरेश वाष (रा. पळसखेड चक्का, ता. सिंदखेड, जि. बुलडाणा), २०१७ मध्ये जालना येथील महाबळेश्‍वर पुंडलिकराव केंद्रे (र. देठणा, ता. कंधार, जि. नांदेड), २०१६ मध्ये नांदेड येथील प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे), किरण कौतिक भाडगे (स. वाकड, ता. कन्नड) व अनीस अलाऊद्दैन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) यांनी ऑनलाइन फॉर्म भरले. त्यावेळी ते उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर वरील सर्व उमेदवारांनी २०२० मध्ये सैन्य भरतीसाठी ऑनलाइन फार्म भरले. मात्र, त्यांनी जन्मतारखेचे बनावट प्रमाणपत्र सादर केले.

विशेष म्हणजे यावेळी सर्व उमेदवार मैदानी आणि लेखी परीक्षेत उत्तोर्ण होऊन भरतीसाठी पात्र ठरले. कागदपत्रांच्या छाननीदरम्यान हा घोटाळा उघकीस आला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आगी प्रशांत रामचंद्र महाले (वय २०, रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे) याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी आरोपीने जन्मतारीख बदल करण्यासाठी कागदपत्र, एसएससीचे जन्मतारीख असलेले प्रमाणपत्र हस्तगत करून तपास करायचा आहे. आरोपीने कशाप्रकारे जन्मतारखेत बदल केला याचाही तपास बाकी असल्याने आरोपीच्या जामीनाला विरोध केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com