यंदाचा गणेशोत्सव होणार जल्लोषात

मंडळांना परवानगी ऑनलाईनच
यंदाचा गणेशोत्सव होणार जल्लोषात

औरंगाबाद - aurangabad

गणेश मंडळांना (Ganesha Mandal) श्री गणेशाची मूर्ती बसविण्यासाठी परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज (Online application) करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोलीस (police), महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी भेट देऊन परवानगी संदर्भात कार्यवाही करतील, अशी माहिती पोलीस आयुक्‍त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.

लहानापासून ते वृध्दांपर्यंत, आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होत आहे. मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. यावर्षी मात्र नेहमीप्रमाणे गणेशोस्तव हा जल्लोषात साजरा केला जाणार असून यासाठी औरंगाबाद मनपा आणि पोलिस प्रशासानाने युध्दपातळीवर यासाठी तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांने घोषित केल्याप्रमाणे यावेळेस ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन एकाच ठिकाणी परवानगी मिळणार असून महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर याची सुरवात देखील झाली आहे. राज्याच्या प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलिस महासंचालक संजय कुमार नुकतेच त्या अनुषंगाने दौऱ्यावर होते. जिल्हा पोलिसांसह त्यांनी शहर पोलिसांच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, उज्जवला वनकर आणि दिपक गिऱ्हे यांची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने पंधरा मुद्यांवर चर्चा झाली. पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्याकडे यावेळी गुप्ता यांनी अतिरीक्त २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, १० निरीक्षक, ३०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या ४ कंपन्यांची मागणी केली आहे.

यंदा सोसायट्यांनाही नोंदणी

सोसायट्यांमध्ये साजरे होणारे सामुहिक गणपती उत्सवाची मात्र नोंद होत नाही. त्यामुळे सोसायट्यांना देखील सामुहिक गणेशोत्सवाची माहित संबंधित पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखित गुप्ता यांनी केले आहे. नागरिकांना कुठलिही शंका असल्यास, मदत लागल्यास, काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी संबंधित ठाणे, नियंत्रण कक्ष किंवा ११२ वर मदत मागावी, असे गुप्ता म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com