दिवाळीनिमित्त मराठवाड्यातून  साडेतीनशे बसेस  

उत्पन्नवाढीची अपेक्षा 
दिवाळीनिमित्त मराठवाड्यातून 
साडेतीनशे बसेस  

औरंगाबाद - aurangabad

एसटी (s t bus) महामंडळ सध्या उत्पन्नवाढीसाठी चांगलेच सरसावले असून, यासाठी दिवाळी (Diwali) सणासाठी जादा बस वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक ३६८ दिवाळी जादा बसेस मराठवाड्यातून सोडण्यात येणार आहेत.

दिवाळी सण आणि त्याला जोडून येणाऱ्या सुट्यांमुळे राज्यभरातून हजारो कुटुंब प्रवासाला निघतात. दिवाळी सणासाठी आपल्या घरी जातानाच पर्यटनाला जाणाऱया प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने यंदा राज्यभरात १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान या जादा बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com