Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedजॅकवेलच्या कामाची तज्ज्ञांकडून पाहणी

जॅकवेलच्या कामाची तज्ज्ञांकडून पाहणी

औरंगाबाद – aurangabad

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) जॅकवेलचे काम नवीन तंत्रज्ञानानुसार करण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणि अन्य बाबींची पाहणी तज्ज्ञांनी केली. पाहणीचा अहवाल येत्या तीन-चार दिवसांत त्या तज्ज्ञांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Life Authority) आणि कंत्राटदार कंपनीला दिला जाणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर जॅकवेलच्या कामाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

- Advertisement -

नवीन पाणीपुरवठा योजनेचा मुख्य भाग जायकवाडी धरणातील जॅकवेलचा आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले, तरी जॅकवेलचे काम झाल्याशिवाय शहराला पाणी मिळणार नाही. त्यामुळे जॅकवेलचे काम गतीने व्हावे, यासाठी शासकीय, प्रशासकीय यंत्रणांकडून पाठपुरावा केला जात आहे. कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. जॅकववेलचे काम नवीन तंत्रज्ञानानुसार करण्यासाठी कंत्राटदार कंपनीची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यात आले. तेव्हा मुंबईहून तज्ज्ञ मंडळी येणार असल्याचे व ते जायकवाडी येथे जाऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे म्हणाले, जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीने जीओ टेक या कंपनीच्या तज्ज्ञांना मुंबईहून बोलावले होते. जयदीप वाघ त्यासाठी मुंबईहून आले होते. त्यांनी जायकवाडी धरणातील पाण्याच्या पातळीचे जीओ टेक्निकल सर्वेक्षण केले. धरणाच्या तळाला कठीण खडक कुठे लागू शकतो, त्यावर काम कसे करता येऊ शकेल याबद्दलचे हे सर्वेक्षण होते. सर्वेक्षणाचा अहवाल तीन-चार दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतर जॅकवेलच्या कामाची पुढील दिशा ठरवली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या