Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजळगावच्या महिला वसतीगृह प्रकरणी चौकशी समिती स्थापन

जळगावच्या महिला वसतीगृह प्रकरणी चौकशी समिती स्थापन

मुंबई – Mumbai

जळगावात वसतीगृहामध्ये मुलींना चौकशीला बोलावून घेतलं. ज्या गेल्या नाहीत त्यांना कपडे काढायला लावून त्याच्या व्हिडीओ क्लीप बनवल्या, असा मुद्दा भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी उपस्थितीत केला. या मुद्याची नोंद घेतली असं उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

महिला वसतीगृहामध्ये मुलींना नग्न नाचवल्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान पाहण्यास मिळाले. अखेर या प्रकरणावरून चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येत आहे. याचा दोन दिवसात अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

गृहमंत्र्यांच्या या विधानाचा सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. या प्रकरणाची काही तासात चौकशी करतो, कारवाई करू, असं देशमुख यांनी घोषणा करायला पाहिजे. पण महिलांच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील आहे. मग कशाला सरकार पाहिजे. इथे तर राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणीच आम्ही करतो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले.

जळगाव प्रकरणी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याचा दोन दिवसांत अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या