औरंगाबादमध्ये अत्यावश्यक सेवाही केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच

नियमावलीत काहीसा बदल
औरंगाबादमध्ये अत्यावश्यक सेवाही केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच

औरंगाबाद - Aurangabad

आता अत्यावश्यक सेवाही केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहतील. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत यावर एकमत झालं असून तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडं करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हेदेखिल बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. त्यात सर्वांनी एकमुखानं निर्णय घेतला. या निर्णयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. आमदार अंबादास दानवे हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहेत.

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवांमधील दुकानेदेखिल आता केवळ दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. एक वाजेनंतर सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. किराणा आणि इतर दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. रमजानच्या निमित्तानं सायंकाळी 3 तास फळांची दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

मेडिकलसाठीही काय नियम असणार यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार दवाखान्यासोबत असलेले मेडिकल 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. मात्र दवाखान्याशिवाय असलेले स्वतंत्र मेडिकल दुपारी एकनंतर संध्याकाळी 3 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com