Nitin Gadkari
Nitin Gadkari|MSME NYCS
अन्य

पारंपारिक कौशल्यांना आधुनिकतेची जोड देत उद्यमशीलता जोपासावी- नितीन गडकरी

ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे आणि टाकाऊ पासून टिकाऊ उत्पादन निर्मीतीकडे वाटचाल करणे आवश्यक

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) Pune - आत्मनिर्भर भारत अभियानाचा MSME (सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग) हा कणा असून पारंपारिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवउद्योजक तयार झाले पाहिजे. ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे आणि टाकाऊ पासून टिकाऊ उत्पादन निर्मीतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. मत्सव्यवसाय, मधमाशी पालन, मशरुम उत्पादन, बांबू उत्पादन आणि त्याच्याशी संबंधीत लघुउद्योगांना जागतिक बाजारपेठेत पण खूप मागणी आहे. त्यासाठी दर्जा, संशोधन आणि प्रयोगशिलता या त्रिसुत्रींचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रिय रस्ते वाहतूक आणि परिवहन तसेच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री Nitin Gadkari यांनी व्यक्त केले.

पुणे येथील एनवायसीएस अर्थात, National Yuva Cooperative Society नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे 'एमएसएमई (सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील नव्या संधी' या विषयावर NYCSIndia या फेसबुक पेज वर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते.या वेबिनारचर्चेत एन. वाय.सी. एस.चे अध्यक्ष प्रकाश चन्द्र साहू आणि NYCS चेअरमन राजेश पांडे हे देखील सभागी झाले होते.

नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, पाश्यात्य देशांपेशा भारतात नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्धत आहेत. तसेच भारतीय संस्कृतीवर आधारीत पांरपारीक कलात्मकता आपल्यात भिनलेली आहे. त्याच गुणांचा मेळ घालत आपण आप्यातील उद्यमशिलता विकसीत केली तर अनेक संधी आपल्यापुढे नतमस्तक होतील. कोणताही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो. त्यात तुम्ही दर्जा टिकविला तर ग्राहक तुमच्याशिवाय दुसरी कडे जात नाहीत. निर्यातीचा दर्जा टिकवत पॅकेजींगसह इतर बाबींवर लक्ष केंद्रीत केले तर जागतिक बाजारपेठेची दारे खुली होतात. आत्मनिर्भर भारत अभियानात प्रामुख्याने निर्यात वाढून आयात कशी कमी होईल या दृष्टीने काम सुरु आहे.

NYCS चेअरमन राजेश पांडे यांनी या वेबिनारच्या आयोजनामागची भूमिका विषद करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल. तर NYCS अध्यक्ष प्रकाश चन्द्र साहू यांनी आभार मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com