राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!

संतनगरी शेगावात उत्साह, श्रीच्या' समाधीचे घेणार दर्शन
राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!

शेगाव - प्रतिनिधी Shegaon

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर वारकरी संप्रदायातर्फे गोल रिंगण केले जाणार असून, यात राहुल गांधी टाळ हाती घेऊन पावली खेळणार आहेत तसेच श्री संत गजानन महाराज मंदिरात (Sant Gajanan Maharaj Temple) जाऊन 'श्रीं'च्या समाधीचे दर्शनही घेणार असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण आहे.

राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे
राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी व शेवटची जाहीर सभा संतनगरी शेगाव येथे शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून, या सभेच्या तयारीने वेग घेतला आहे. संपूर्ण शेगाव नगरी तिरंगा ध्वजांनी सजली असून, पदयात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस नेत्यांचा राबता वाढला आहे.

सभेसाठी पाडलिवाल मैदानावर व्यासपीठाची उभारणी सुरू झाली आहे. यात मुख्यव्यासपीठा खेरीज भारत यात्रींसाठी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ राहणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या येथे दाखल दृकश्राव्य पडद्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे, आहे. तर सभेपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दि. १५ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातून विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठी कनेरगाव नाका येथे दाखल होणार असून, या ठिकाणी विदर्भवासीयांतर्फे स्वागत केले जाणार आहे.

राहुल गांधी वारकऱ्यांसोबत खेळणार पाऊली!
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

यात्रा १६ ते १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात राहणार असून, दि.१८ ते १९ बुलढाणा जिल्हामार्गे दि. २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात बुऱ्हाणपूरकडे जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com