औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याला जानेवारी अखेरची डेडलाईन

पोलीस अधीक्षकांची संयुक्त पाहणी
औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याला जानेवारी अखेरची डेडलाईन

औरंगाबाद - aurangabad

जळगाव (jalgaon) टी पॉइंट ते अजिंठा लेणी (Ajanta Caves) पर्यंतच्या रस्त्याची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हर्सूल ते अजिंठा रस्त्याची संयुक्त पाहणी केली.

तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून रस्त्याचे काम पुर्ण करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पाण्डेय यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) मनीष कलवानीया, उपविभागीय अधिकारी रामेश्वर राडगे,तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार शीतल राजपूत, सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगांव तहसीलदार जसवंत, पल्लवी सोनवणे, कार्यकारी अभियंता, राष्टीय महामार्ग औरंगाबाद, विकास महाले, कार्यकारी अभियंता राष्टीय महामार्ग धुळे, शाखा अभियंता सागर कळंब, गजानन कामेकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी रस्ते पाहणी दरम्यान उपस्थित होते.

पर्यटकांची (tourists) संख्या पाहता अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टराची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र (maharastra) पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com