औरंगाबादेत मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये लसीकरणावर भर

औरंगाबादेत मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये लसीकरणावर भर

मायक्रो, मीडिअम व लार्ज असे तीन प्रकारचे कन्टेनमेंट झोन

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद महापालिकेने वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शहरात 26 भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. आता यातील मायक्रो झोनमधील जबाबदारी त्या-त्या परिसरातील गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांवर दिली जाणार आहे. सोसायटीतील अधिकाधित नागरिकांच्या चाचण्या, लसीकरण करून घेणे, तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती पालिकेला कळवण्याची जबाबदारी अध्यक्ष व सचिवांना पार पाडावी लागणार आहे.

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नमूद केले की, शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने कन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. त्यात मायक्रो, मीडिअम व लार्ज असे तीन प्रकारचे कन्टेनमेंट झोन आहेत. यातील मायक्रो झोनमधील संसर्ग कमी करण्यावर पालिका अधिक भर देणार आहे.

अर्पाटमेंट, टाऊनशिपमधील 20 टक्के नागरिक पॉझिटिव्ह आल्याने हे भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे सोसायटी अध्यक्ष व सचिवांवर अपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे, लसीकरण करणे अशा जबाबदार्‍या दिल्या जाणार आहेत. चाचण्यांनंतर कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची माहिती पालिकेला कळवावी लागेल.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील स्वयंसेवकांनी समोर यावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले. त्या भागातील लोकांचा सहभाग असेल तर साथ नियंत्रणात येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com