Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआता ट्विटरवरही वापरा फेसबुकसारख्या 'Emoji'

आता ट्विटरवरही वापरा फेसबुकसारख्या ‘Emoji’

नवी दिल्ली I वृत्तसंस्था

फेसबुकपाठोपाठ आता ट्विटरही आपल्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इमोजी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. रिव्हर्स इंजिनीअर जेन मँचाउन वाँग यांनी याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

ट्विटरचे प्रतिस्पर्धी लिंक्डइन, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे इमोजीचे पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहेत. सध्या ट्विटर अ‍ॅप आणि वेबसाइटवर युजरला केवळ हार्टचं इमोजी वापरता येते. ते लाईक म्हणूनही गृहित धरले जाते.

सध्या ट्विटरवर युजर डायरेक्ट मेसेजेस म्हणजेच इनबॉक्समध्ये इमोजींचा वापर करू शकतात. वेगवेगळे इमोजी वापरून ते ‘disappearing stories’ चा वापर करू शकतात. मार्च महिन्यात ट्विटरने युजर इमोजी किती प्रमाणात वापरतात आणि डिसलाईक किंवा डाउनव्होट बटण किती वेळा वापरतात याचा सर्व्हे सुरू केला आहे.

तसेच अ‍ॅपल स्टोअरमधील लिस्टिंगवरून ट्विटरची पेड सेवा ‘ट्विटर ब्लू’च्या किमतीबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. वाँगने ही सेवा वापरली आणि सांगितले की, या सेवेमध्ये युजरला कलर थिम्स आणि कस्टम अ‍ॅप आयकॉन्ससारखी प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. कंपनी लवकरच रीडर मोड सेवाही उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

ट्विटर या पेड सेवेमध्ये आवडती ट्विट्स एकत्र करून एका जागी सेव्ह करण्याचे फीचरही उपलब्ध करून देऊ शकते. कंपनीने याच महिन्यात स्क्रोल पद्धत अवलंबली असून त्यातच मोकळेपणाने युजरला बातम्या वाचता याव्यात अशी सुविधा देण्याचा कंपनीचा विचार आहे. ट्विटरने निवडक युजर्सनाच पेड सेवेबद्दलच्या सर्व्हेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. त्यात undo send, custom color options, profile badges, auto-replies, अशी फीचर्स पेड सेवेत उपलब्ध करून देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या