पात्र विद्यार्थ्यांनो लवकरात लवकर लस घ्या-जिल्हाधिकारी

पात्र विद्यार्थ्यांनो लवकरात लवकर लस घ्या-जिल्हाधिकारी

औरंगाबाद - aurangabad

कोरोनापासून (corona) बचाव करण्यासाठी लसीकरण (Vaccination) करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्ञानदिप फाऊंडेशनचे संस्थापक गोविंद बद्रीनारायण काबरा, शितल काबरा, आभा गोविंद काबरा आणि फाऊंडेशनचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचे मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेमुळे प्रबळ होणार आहे. लस घेतली तरी सर्वांनीच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सर्वांनी वारंवार साबणाने हात धुणे, तोंडावर मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही खबरादारी घेतली तर आपला नक्कीच कोरोनापासून बचाव होईल असे सांगूण जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्व सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com