चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

२, ३७५ स्टेशन्स प्रस्तावित
चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

औरंगाबाद - aurangabad

पर्यावरणपूरक आणि पेट्रोल डिझेलच्या (Petrol diesel) वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना (Electric vehicle) मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनापैकी ३० टक्के ही इलेक्ट्रिक वाहने असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू असून राज्यातील विविध ठिकाणी २, ३७५ स्टेशन्स प्रस्तावित केले आहेत.

आत्तापर्यंत महावितरणने (MSEDCL) आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक बाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करुन ठाण्यात ५, नवी मुंबई - २ पुणे - ५ आणि नागपूर - १ अशी एकूण १३ वर वहत स्टेशन केली आहेत. याशिवाय महावितरणमारदैत अस्तावित अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नवी मुंबई-१०, ठाणे-६, नाशिक- २, औरंगाबाद-२, पुणे- १७, सोलापूर- २, नागपूर -६, कोल्हापूर- २, अमरावती- २ अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. यासोबतच राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक बाहन धोरण- २०२१ (दि. २३ जुलै २०२१) जाहीर केले आहे. त्यानुसार सन २०२५ पर्यंत राज्यातील इलेक्ट्रीक वाहन चाजिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर- १५००, पुणे शहर- ५००, नागपूर- १५०, नाशिक- १००, ठाणे-५००, औरंगाबाद शहर -७५, अमरावती-३०, सोलापुर- २० अशी एकूण २,३७५ तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे पूर्णत: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने (Central Government) इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो. याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com