औरंगाबाद शहरात लवकरच धावणार ‘इलेक्ट्रिक स्मार्ट बस’

औरंगाबाद शहरात लवकरच धावणार ‘इलेक्ट्रिक स्मार्ट बस’

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचा उपक्रम

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बस (Smart City Electric Bus) योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात 5 इलेक्ट्रिक स्मार्ट बस खरेदी करण्याची योजना औरंगाबाद स्मार्ट सिटीने सोमवारी सार्वजनिक वाहतूक नियोजन आणि अंमलबजावणी एजन्सीने यूके पॅक्टद्वारे आयोजित इलेक्ट्रिक बस (Electric bus) खरेदीवरील राष्ट्रीयस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतला.

औरंगाबाद शहरात लवकरच धावणार ‘इलेक्ट्रिक स्मार्ट बस’
औरंगाबादला डॉक्टरांचे संमेलन

सध्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एएससीडीसीएल) डिझेलवर 100 बस स्मार्ट सिटी बस सेवा देत आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त तथा एएससीडीसीएलचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय (CEO Astik Kumar Pandey) यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शहर बस सेवेचा भाग म्हणून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार यूके पॅक्ट या यूके सरकारच्या कार्यक्रमाद्वारे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वेगवेगळ्या शहरांमध्ये चालवल्या जाणाऱ्या मॉडेल्सविषयी तसेच विविध शहरांद्वारे इलेक्ट्रिक बस खरेदी आणि चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध मॉडेल्सविषयी माहिती देण्यात आली.

तसेच कार्यशाळेतील खर्च, चार्जिंग स्टेशन उभारणे, विविध एजन्सींची देखभाल आणि निविदा प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये औरंगाबाद स्मार्ट सिटी बसचे मुख्य संचालन प्रशासक राम पवनीकर, उप प्रशासक सिद्धार्थ बनसोड आणि प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांनी भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com