दिलासादायक... राज्यात कुठेही भारनियमन नाही!

महावितरणचे उत्तम नियोजन
दिलासादायक... राज्यात कुठेही भारनियमन नाही!

औरंगाबाद - aurangabad

कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये (Power crisis) अनेक राज्ये विजेच्या भारनियमनाला तोंड देत आहेत. मात्र, (MSEDCL) महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे (maharastra) राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात आहे. त्यामुळे महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर तसेच (Agricultural pumps) कृषिपंपांना वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री ८ तास अखंडित व सुरळीत (Power supply) वीजपुरवठा केला आहे.

अखंडित वीजपुरवठ्याची ही परिस्थिती बुधवारी (दि.२७) देखील कायम होती व कुठेही भारनियमन करण्यात आले नाही. प्रामुख्याने कोळसा टंचाईसह इतर विविध कारणांमुळे विजेचे संकट सध्या देशव्यापी झाले आहे. कमी अधिक प्रमाणात देशातील अनेक राज्यांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सवीधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून विविध स्त्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दिलासादायक... राज्यात कुठेही भारनियमन नाही!
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पण...
दिलासादायक... राज्यात कुठेही भारनियमन नाही!
Photo Gallery : ‘मै थुकेगा नही’..., बाहुबली की नही तो झाडुबली की जरूरत है!

कोणत्याही क्षणाला विजेची तूट निर्माण होत असल्याची स्थिती दिसून येताच पयायी वीज उपलब्ध करून भारनियमन टाळण्यात महावितरणला यश येत आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि.२२) बुधवारपर्यंत (दि.२७) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. यापुढेही विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनादारे कुठेही विजेचे भारनियमन करावे लागणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याउलट देशातील वीज संकट अधिकच गडद झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

दिलासादायक... राज्यात कुठेही भारनियमन नाही!
IPL 2022 : पंजाब-लखनौ आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आकडेवारीनुसार देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आदींसह १० राज्यांमध्ये साधारणतः ९ ते १५ टक्क्यांपर्यंत विजेची तूट असल्यामुळे विजेचे भारनियमन करावे लागले. मात्र मंगळवारी (दि.२६) विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या १० वरून १५ झाली आहे. तथापि, देशात सर्वाधिक २७ हजार ८३४ मेगावॅट विजेचा पुरवठा करताना महाराष्ट्रात मात्र कुठेही भारनियमन करावे लागले नाही. यामध्ये मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने मागणीप्रमाणे केलेल्या २३ हजार ७९४ मेगावॅट अखंडित वीजपुरवठ्याचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com